Wednesday, April 6, 2011

माझा वेडा ग साजण

कुणी सांगितली मला त्याची प्रकाशाची खूण
तो आला भेटण्याला किर्र अंधार बनून.
कुणी सांगितले मला त्याचे श्वास ग नितळ
परि वेढले तयाने उधळीत वावटळ.
विस्कटून टाकले ग सर्व शिंगाराला त्याने
नेले वेळूच्या बनात मला भलत्या रस्त्याने.
कालिंदीच्या तरंगांनी माझे वसन फेडले
त्याच्या सारखेच मला पूर्ण निखळ गे केले.
माझा वेडा ग साजण्,त्याच्या सांगू नये कथा
त्याला जाणले पुरते तोच माझ्यात विरता.

No comments:

Post a Comment