Wednesday, April 6, 2011

श्यामा

श्यामा !
गोमतीच्या सावळ्या पाण्यात
चंद्रबिंब झुलावे तशी चाफेगौर
तू उतरलीस या नावात.
तुझे झाले दर्शन
लखनऊला ऐकलेल्या गझलातून,
नात्-कव्वालीतून्,'आरजू'तल्या साधनाच्या रूपातून-
अलिफपासून अलीफपर्यंत.
तू रहायला आलीस म्हणूनच
माझ्या मनाचा इमामबाडा झाला
जिथे अजूनही गुंजतोय
तुझ्या नावाचा पुकारा,आणि
त्याच्या प्रतिध्वनीतून प्रतिध्वनि...तून्...प्रतिध्वनि.....
ढासळलेल्या वर्षांच्या ढिगार्याखाली
तेव्हाचा मी केव्हाच गाडला गेलोय;
तू मात्र अजूनही तशीच आहेस माझ्या मनात!
माझ्या कडून आताही नि:श्वासांनी
का तुझ्याच कविता वदवून घेते आहेस?

No comments:

Post a Comment