हिंदोळा
जुना सुजाण पिंपळत्याच्या शाखेस बांधला
म्रुदु वेलांच्या दोरांनी
माझ्या जिवाचा हिंदोळा.
हिंदोळ्याच्या झोळणीत
पहुडले माझे मन
त्याला दिशांच्या हातांनी
हळू झुलवी अंबर.
वारा वहतो भोवती
गात हिंडोलाचे सूर
मन तरीहि बेचैन
आत कसले काहूर?
हाक आकाशाची येता
मनी उठती कल्लोळ
झोका उंच उंच जाता
कसा सावरावा तोल?
No comments:
Post a Comment