काठावरी मनाच्या....
काठावरी मनाच्या झुकुनी पाहात होतोमी अंतरात माझ्या उतरू पाहात होतो.
काळोख दाटलेला दिसला तिथे परंतु
मी व्यर्थ चांदण्याला शोधू पाहात होतो.
हिंदोळता जरासा नव्हता तिथे तरंग
पाषाण स्तब्धसा मी बनुनी रहात होतो.
संदर्भ ओळखीचा मज एकही दिसेना
आलो चुकून का मी परक्या घरात होतो?
गेले कुठे तराणे, मज सूर सापडेना
तुतल्या विणेवरी मी ठेवून हात होतो.
No comments:
Post a Comment