Wednesday, April 6, 2011

सांज जाण्याला निघाली...

सांज जाण्याला निघाली, जवळ ये आता जरा
आज देहातून आला बघ फुलोनी मोगरा.
माळुनी केसात घे ना रात्र कोमल सावळी
मंद झाली चंद्र्-ज्योती तारांगणाच्या राउळी.
किर्र रात्री तेजपंक्ति रेखिती बघ काजवे
हीच माझी प्रेमगीते, ही तुझ्यास्तव आर्जवे.
बोलु जे शब्दांविना ते ऐकुया रुधिरातुनी
आज श्वासतून आली अंगी मदिरा पाहुणी.
लागतो ना मेळ झ्यांचा विसर ती सारी गणिते
विसर आता तल्खलीला, ऐक केवळ चंद्रगीते.

No comments:

Post a Comment