Wednesday, April 6, 2011

डोह

अशा कातरवेळेला डोहाकडे जाऊ नये
 उंबराच्या पारावर दिवा तरी लावू नये.
पसरली डोहातळी उंबराची भुकी मुळे
वर झुलते फसवे काळ्या साउल्यांचे जाळे.
उंबराच्या पारावर किती पणत्या फुटल्या
डोह जाणतसे सार्या पोरी वाटा चुकलेल्या.
जरी विरागी उंबर्,त्याच्या पानांत साठले
गळे घोटलेले श्वास आणि निरोप गोठले.
डोहातळाशी जमल्या भोळ्या सासुरवाशिणी
त्यांचे डागल्याचे व्रण कसे लिंपणार पाणी?
सारे इतुके ऐकून तरी चाललीस पोरी,
ठेव काठावर आता पाळण्याची मुकी दोरी.

No comments:

Post a Comment