Wednesday, April 6, 2011

जळवंती

सखी सैरभैर झाली
जाणे कुठेशी निघाली
तिच्या संगती चालण्या
बाग रस्त्यावर आली.
   आजूबाजूच्या झाडांनी
    पानतोरणे बांधली
    सावल्यांची पायघडी
    वाटेवर अंथरली.
        नदीकाठावर तिला
         पक्षी एकटा भेटला
         गळ्यातला सूर त्याने
         तिच्या पायात बांधला.
सखी नाचाया लागली
सांभाळून तीच धून
पाणियाच्या तरंगाला
अंगाभोती लपेटून.
       जळी प्रवास थांबला
       नाच अंगात रिघला
       सखी होता जळवंती
       कोण शोधण्यासि आला?

No comments:

Post a Comment