Wednesday, April 6, 2011

विराणी

दिला सतीने सोडून
दिवा नदीच्या पाण्यात
पिंजलेल्या आर्जवांच्या
चिंध्या उरल्या गाण्यात.
  आसूभिजले काजळ
ऐन्यावर पसरले,
  कुंकवाच्या करंड्यात
  कोरे प्राक्तन पुरले.
चुडा उदास हिरवा
हातामधेच चिणला,
गळ्याभोवती श्वासांचा
गोफ घट्टसा विणला.
पिंड देउनि सोडता
पैलतीराला कावळे,
गुंता सुटोनिया झाले
केस सतीचे मोकळे.

No comments:

Post a Comment