Wednesday, April 6, 2011

नको लटकेच रुसू

नको लटकेच रुसू
ओठी मोहरते हसू.
कशासाठी अळीमिळी
गाली खुलतसे खळी.
डोळे जरी रागावती
पापण्या का बोलावती?
फुका मौनाचा पहारा
बोले वक्षाचा शहारा.
ऐक कानासि लावून
कांकणांची प्रेमधून.
खेळू नये उगा असा
लपंडाव जमेनासा.

No comments:

Post a Comment